✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२८ ✍️
राजेशचा पहिल्या तीन महिन्यांचा सरासरी खर्च ₹ २२,००० होता तर पुढील नऊ महिने सरासरी ₹ १८,००० खर्च झाले आणि पूर्ण वर्षभरात ₹ ७२,००० ची बचत झाली तर राजेशचा महिन्याचा सरासरी पगार(उत्पन्न) किती ?
➡️ उत्तर :-
राजेशचा महिन्याचा सरासरी पगार x रुपये आहे असे मानू.
➡️ राजेशचा पहिल्या तीन महिन्यांचा खर्च
= ३ × २२,०००
= ₹ ६६,०००
➡️ पुढील नऊ महिन्यांचा खर्च
= ९ × १८,०००
= ₹ १,६२,०००
➡️ संपूर्ण वर्षात राजेशने केलेली बचत = ₹ ७२,०००
∴ राजेशचे एका वर्षातील एकूण उत्पन्न
= वार्षिक खर्च + वार्षिक बचत
= ( ६६,००० + १,६२,०००) + ७२,०००
= २,२८,००० + ७२,०००
= ₹ ३,००,०००
➡️ x = ३,००,००० /१२
∴ x = ₹ २५,०००
∴ राजेशचा एक महिन्याचा सरासरी पगार (उत्पन्न) ₹ २५,००० आहे.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

