✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १३२ ✍️
अब्दुल ने एक खेचर आणि एक गाढव प्रत्येकी १५,००० रुपयांना विकले. त्यापैकी एका व्यवहारात २५ % नफा तर दुसऱ्या व्यवहारात त्याला २५% तोटा झाला. या संपूर्ण व्यवहारात अब्दुलला ……..होईल?
➡️ उत्तर :-
खेचर आणि गाढव यांची एकत्रित विक्री किंमत
= १५,००० + १५,०००
= ₹ ३०,०००
खेचराची खरेदी किंमत x रुपये मानू.
नफा = २५%
➡️ जर खेचराची खरेदी किंमत १०० रुपये असेल तर त्याची विक्री किंमत १२५ रुपये असेल.
∴ x = १०० × १५,०००/१२५
∴ x = ४ × ३०००
∴ x = ₹ १२,०००
गाढवाची खरेदी किंमत y रुपये मानू.
तोटा = २५%
➡️ जर गाढवाची खरेदी किंमत १०० रुपये असेल तर त्याची विक्री किंमत ७५ रुपये असेल.
∴ y = १०० × १५,०००/७५
∴ y = ४ × ५०००
∴ y = ₹ २०,०००
➡️ गाढव आणि खेचर यांची एकत्रित खरेदी किंमत
= २०,००० + १२,०००
= ₹ ३२,०००
येथे,
विक्री किंमत < खरेदी किंमत
∴ या व्यवहारात तोटा होईल.
∴ तोटा = खरेदी किंमत – विक्री किंमत
= ३२,००० – ३०,०००
= ₹ २,०००
➡️ म्हणून या संपूर्ण व्यवहारात अब्दुलला ₹ २००० तोटा होईल.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

