✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १३६ ✍️
एक हौद दहा तासांत भरतो परंतु त्याच्या तळाशी छिद्र पडल्यामुळे त्याला पूर्ण भरण्यासाठी आता १२ तास लागतात. जर तो पूर्ण भरलेला असेल तर रिकामा होण्यास किती वेळ लागेल?
➡️ उत्तर :-
तो हौद रिकामा होण्यास x तास लागतील असे मानू.
∴ तो हौद एका तासात १ /x इतका रिकामा होईल. ……(i)
➡️ हौद भरण्यासाठी लागणारा वेळ = १० तास
∴ एका तासात हौद १/१० इतका भरेल.
➡️ आता , तळाशी छिद्र पडल्यामुळे हौद भरण्यासाठी लागणारा वेळ = १२ तास
∴ एका तासात तो हौद १/१२ इतका भरेल.
➡️ म्हणजेच ,
तो हौद एका तासात [ ( १/१०) – (१/१२)] इतका रिकामा होतो….(ii)
➡️ समीकरण ( i ) व ( ii ) वरून ,
१/x = [(१/१०) – (१/१२)]
∴ १/x = [ (६ -५ ) / ६० ]
∴ १/x = १/६०
∴ x = ६०
➡️ म्हणून पूर्ण भरलेला हौद ६० तासांत रिकामा होईल.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

