✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५४ ✍️
२ शर्ट आणि ३ साड्या यांची किंमत ३२०० रुपये आहे. तेवढ्याच पैशात ६ शर्ट आणि १ साडी घेता येते तर ८ साड्यांची किंमत किती?
➡️ उत्तर :-
एका शर्टाची किंमत x रुपये तर एका साडीची किंमत y रुपये मानू.
म्हणून,
८ साड्यांची किंमत = ८y
➡️ पहिल्या अटीवरून,
२x + ३y = ३२०० …….(i)
➡️ दुसऱ्या अटीवरून,
६x + y = ३२०० ………(ii)
➡️ समीकरण (i) ला ३ ने गुणून,
६x + ९y = ९६०० ………(iii)
➡️ समीकरण (iii) मधून समीकरण (ii) वजा करून,
८y = ६४००
➡️म्हणून ८ साड्यांची किंमत ६४०० रुपये आहे.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

