✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ३९✍️
भिवा पाटलांनी आपल्या संपत्तीचे दोन हिस्से केले. पहिला हिस्सा आपल्या प्रशांत, निशांत, सुशांत या तीन मुलांमध्ये अनुक्रमे १:२:३ या प्रमाणात वाटला. मात्र मुलगी शीतल हिला एक रुपयाही दिला नाही. गावातील प्रतिष्ठित लोकांनी पाटलांचे कान टोचल्यामुळे भिवा यांनी आपल्या संपत्तीचा दुसरा हिस्सा मात्र शीतल, प्रशांत , निशांत, सुशांत यांना अनुक्रमे ९:८:७:६ या प्रमाणात वाटला. जर दुसऱ्या हिश्श्याची रक्कम पहिल्या हिश्श्याच्या दुप्पट असेल तर कोणाला सर्वाधिक रक्कम मिळाली?
उत्तर :-
➡️ दिलेेल्या माहितीनुसार,
पहिल्या हिश्श्याचे वाटप पुढीलप्रमाणे
शीतल : प्रशांत : निशांत : सुशांत = ० : १ : २ : ३
➡️ समानपट x मानू.
म्हणून,
शीतलला मिळालेली रक्कम = ०x
प्रशांतला मिळालेली रक्कम = १x
निशांतला मिळालेली रक्कम = २x
सुशांतला मिळालेली रक्कम = ३x
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
दुसऱ्या हिश्श्याचे वाटप पुढीलप्रमाणे
शीतल : प्रशांत : निशांत : सुशांत = ९ : ८ : ७ : ६
➡️ समानपट y मानू.
म्हणून,
शीतलला मिळालेली रक्कम = ९y
प्रशांतला मिळालेली रक्कम = ८y
निशांतला मिळालेली रक्कम = ७y
सुशांतला मिळालेली रक्कम = ६y
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
दुसऱ्या हिश्श्याची रक्कम पहिल्याच्या दुप्पट आहे.
➡️ म्हणून
९y + ८y + ७y + ६y = २( ०x + १x + २x + ३x )
३०y = १२x
म्हणून,
x = (५/२)y ……..(i) ( समीकरणाच्या दोन्ही बाजूस ६ ने भागून )
➡️x = (५/२)y ही किंमत ठेवून.
शीतलला मिळालेली रक्कम = ९y + ०x = ९y + ० × (५/२)y = ९y
प्रशांतला मिळालेली रक्कम = ८y + १x = ८y + १ × (५/२) y = ८y +(५/२) y = (२१/२) y = १०.५y
निशांतला मिळालेली रक्कम = ७y + २x = ७y + २ × (५/२)y = ७y +५y = १२y
सुशांतला मिळालेली रक्कम = ६y + ३x = ६y + ३ × (५/२) y = (२७/२) y = १३.५y
➡️ म्हणून सर्वाधिक रक्कम सुशांतला मिळाली.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी