✍️ गणिताशी गट्टी क्र -९ ✍️ ✍️ ब्लिच केल्यामुळे आयताकृती टॉवेलची लांबी २०%ने तर रुंदी १०% ने कमी झाली तर त्याच्या क्षेत्रफळात किती टक्के घट होईल? ➡️ आयताकृती टॉवेलची मूळ लांबी x एकक तर रुंदी y एकक मानू. टॉवेलचे मूळ क्षेत्रफळ = लांबी × रुंदी = xy चौ.एकक ➡️ ब्लिच केल्यामुळे लांबी २०% तर रुंदी १०% ने कमी झाली. […]
✍️ गणिताशी गट्टी क्र – ८✍️ ✍️ एक मांजर १२ फूट खोली असलेल्या कोरड्या विहिरीत पडली. वर येण्यासाठी ती धडपड करू लागली. उडी मारली की तीन फूट वर जायची अन दोन फूट खाली घसरायची. तर विहिरीबाहेर पडण्यासाठी तिला किमान किती उड्या माराव्या लागतील? ▶️ मांजर तीन फूट वर जाते व दोन फूट खाली घसरते. म्हणजेच एका उडीत ती […]
✍️ गणिताशी गट्टी क्र-७✍️ ✍️ ओजस आणि आरव यांच्या वयाची बेरीज ४९ वर्षे आहे. ओजसचे आताचे वय आरवच्या सात वर्षांपूर्वीच्या वयाच्या दुप्पट असेल तर ओजसचे आताचे वय किती? ➡️ ओजसचे आताचे वय x वर्षे तर आरवचे आताचे वय y वर्षे मानू. ➡️ दिलेल्या पहिल्या अटीवरून, x + y =४९ ……( i ) ➡️ दिलेल्या दुसऱ्या अटीवरून, x […]
✍️गणिताशी गट्टी,क्र.६✍️ ✍️४२ या संख्येला एक तृतीयांश ने भागून येणाऱ्या उत्तरात १४ मिळविल्यास खालीलपैकी कोणती संख्या मिळेल? ➡️४२/(१/३) + १४ = ४२ × ३ + १४ = १२६ + १४ = १४० ➡️म्हणून ४२ या संख्येला एक तृतीयांश ने भागून येणाऱ्या उत्तरात १४ मिळविल्यास १४० ही संख्या मिळेल. ©अजित तिजोरे-८०९७६१७०२० #ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान #गणिताशीगट्टी
✍️गणिताशी गट्टी क्र.-५✍️ ✍️ १ ते १० संख्यामधून एक मूळ संख्या मिळण्याची संभाव्यता किती? ➡️ S ={ १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १०} म्हणून n(S) = १०…..(i) ➡️ A ही एक मूळ संख्या मिळण्याची घटना आहे. म्हणून A = { २, ३, ५, ७ } म्हणून n(A) = ४…..(ii) ➡️ म्हणून P(A) = n(A) […]
✍️गणिताशी गट्टी-क्र.४✍️ ✍️ एका व्हाट्सऍप समूहातील शंभर जणांनी पूरग्रस्तांना मदत म्हणून ठराविक रक्कम देण्याचे ठरविले. परंतु प्रत्यक्ष मदतीच्या वेळी २० जण अनुपस्थित राहिल्याने उपस्थित समूहसदस्यांना प्रत्येकी १०० रुपये जास्त द्यावे लागले. तर त्या व्हाट्सऍप समूहाने पूरग्रस्तांना किती रुपयांचा मदतनिधी देण्याचे ठरविले होते? ➡️त्या व्हाट्सऍप समूहाच्या सदस्यांनी प्रत्येकी x रुपये जमा करण्याचे ठरविले असे मानू. म्हणून […]
✍️गणिताशी गट्टी-क्र.३✍️ ✍️ प्रत्येकी १०० मीटर लांबी असलेल्या दोन रेल्वे विरुद्ध दिशेने धावताना एकमेकींना ८ सेकंदात ओलांडतात. जर एका रेल्वेचा वेग दुसरीच्या दुप्पट असेल तर त्या(जलद) रेल्वेचा वेग काढा. ➡️ समजा संथ रेल्वेचा वेग x मीटर प्रतिसेकंद मानू म्हणून जलद रेल्वेचा वेग = २x मीटर प्रति सेकंद दोन्ही रेल्वे परस्पर विरुद्ध दिशेने धावत आहेत म्हणून […]
✍️गणिताशी गट्टी-क्र.२✍️ ✍️माझ्या मुलीला जितक्या बहिणी आहेत तितके भाऊ आहेत आणि माझ्या मुलाला जितके भाऊ आहेत त्याच्या दुप्पट बहिणी आहेत. तर मला किती मुले आणि मुली आहेत? ➡️ समजा मुलांची संख्या x तर मुलींची संख्या y मानू. पहिल्या अटीवरून, y -१ = x म्हणून x – y = -१……(i) दुसऱ्या अटीवरून २(x-१) = y म्हणून […]
✍️गणिताशी गट्टी-क्र.१✍️ ✍️ पाच वर्षांपूर्वी गौरीचे वय गौरांशच्या वयाच्या पाचपट होते. पाच वर्षानंतर गौरीचे वय गौरांशच्या वयाच्या तिपटीपेक्षा ८ वर्षांनी कमी होते. तर गौरीचे आजचे वय काढा. ➡️ समजा पाच वर्षांपूर्वी गौरांश चे वय x वर्षे होते असे मानू. म्हणून गौरीचे त्यावेळचे वय = ५x वर्षे गौरांशचे आजचे वय = (x+५) वर्षे तर गौरीचे आजचे […]

