✍️ गणिताशी गट्टी क्र.२९✍️
✍️ विकास आपल्या पगाराच्या १०% रक्कम घरभाडयासाठी देतो तर उर्वरित रक्कमेच्या १५% रक्कम मुले शिकत असलेल्या सरकारी शाळेला देणगी म्हणून देतो. उरलेल्या रक्कमेच्या १०% रक्कम पब्लिक प्रॉव्हिडंड फंडात गुंतवतो. नंतर १०००० हजार रुपये स्वतःच्या आकस्मिक गरज निधी खात्यात जमा करून तसेच ५००० रुपये स्वखर्चासाठी ठेवून राहिलेले २६३१० रुपये आपल्या पत्नीकडे घरखर्चासाठी देतो तर विकासचा पगार किती आहे?
➡️ विकासचा पगार ₹x आहे असे मानू.
घरभाडे = १०% x
घरभाडे = (१०/१००) x
घरभाडे = (१/१०) x
घरभाडे देऊन उरलेली रक्कम
= x – (१/१०) x
= (१०x – १x )/ १०
= ९x/१० रुपये
➡️ सरकारी शाळेला देणगी दिलेली रक्कम
= १५% ९x/१०
= (१५/१००) (९x/१०)
= २७x/२०० रुपये
➡️ देणगी देऊन उरलेला पगार
= (९x/१०) – (२७x/२००)
= (१८०x/२००) – (२७x/२००)
= १५३x / २००
➡️ पब्लिक प्रॉव्हिडंड फंडात जमा केलेली रक्कम
= १०% (१५३x/२००)
= १५३x/२००० रुपये
➡️ प्रॉव्हिडंड फंड जमा करून उरलेली रक्कम
= (१५३x/२००) – (१५३x/२०००)
= (१५३०x/२०००) – (१५३x/२०००)
= १३७७x/२००० रुपये.
➡️ दिलेल्या अटीवरून,
१३७७x/२००० = १००००+५०००+२६३१०
१३७७x/२००० = ४१३१०
x = ४१३१०×२०००/१३७७
x = ६०००० रुपये.
➡️ म्हणून विकासचा पगार ६०,००० रुपये
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

