✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९३ ✍️
*आचार्यात् ……कालक्रमेण च।।* या संस्कृत श्लोकानुसार विद्यार्थी एकूण चार मार्गांनी ज्ञान मिळवतो. एकूण ज्ञानापैकी एक चतुर्थांश ज्ञान तो सहाध्यायांकडून मिळवतो. त्यानंतर उर्वरित ज्ञानापैकी एक तृतीयांश ज्ञान अनुभवांतून मिळवतो. त्यानंतर उरलेल्या ज्ञानापैकी निम्मे ज्ञान तो स्वतः च्या बुद्धीने मिळवत असेल तर तो त्याने मिळवलेल्या एकूण ज्ञानापैकी किती ज्ञान शिक्षकांकडून मिळवतो?
➡️ उत्तर :-
विद्यार्थ्याने मिळवलेले एकूण ज्ञान x मानू.
➡️ सहाध्यायांकडून मिळवलेले ज्ञान = (१/४)x
त्यानंतर उर्वरित ज्ञान = x – (१/४)x = (४x – १x) / ४ = (३/४)x
➡️ विद्यार्थ्याने अनुभवांतून मिळवलेले ज्ञान = (१/३)(३/४)x = (१/४)x
त्यानंतर उर्वरित ज्ञान = (३/४)x – (१/४)x = (२/४)x = (१/२)x
➡️ विद्यार्थ्याने स्वतःच्या बुद्धीने मिळवलेले ज्ञान
= (१/२)(१/२)x = (१/४)x
➡️ म्हणून,
विद्यार्थ्याने शिक्षकांकडून मिळवलेले ज्ञान
= x – [(१/४)x+(१/४)x+(१/४)x]
= x – [(३/४)x]
= (४x – ३x)/४
= (१/४) x
➡️म्हणून विद्यार्थी शिक्षकांकडून एकूण ज्ञानाच्या एक चतुर्थांश ज्ञान मिळवतो.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

