✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ६१ ✍️ रंगाचे एक पाकीट ३० रुपयांना विकून आकाश ५०% नफा मिळवीत असे. परंतु कोविड – १९ च्या भीतीने लोक धुळवडीसाठी रंग खरेदी कमी करू लागल्यामुळे आहे तो माल संपविण्यासाठी त्याने आधीच्या विक्री किमतीवर ( ₹ ३०) पाकिटामागे ३०% डिस्काऊंट द्यायला सुरुवात केली. तर या व्यवहारात दर पाकिटामागे त्याला नफा […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ६० ✍️ अक्षयने बँकेकडून द. सा. द. शे. १२ दराने काही रक्कम सरळव्याजाने कर्जाऊ घेतली. तीन वर्षांच्या व्याजापोटी त्याने ७२०० रुपये भरले असतील तर अक्षयने बँकेतून किती रुपयांचे कर्ज काढले होते ? ➡️ उत्तर :- अक्षयने बँकेकडून x रुपयांचे कर्ज काढले होते असे मानू. मुद्दल = म = x रुपये व्याजदर […]
✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५९✍️ राजेशच्या व त्याच्या वडिलांच्या सध्याच्या वयाची बेरीज ४८ वर्षे आहे. चार वर्षांपूर्वी वडिलांचे वय राजेशच्या वयाच्या चौपट होते तर चार वर्षानंतर राजेशचे वय किती असेल? ➡️ उत्तर :- राजेशचे सध्याचे वय x वर्षे मानू. म्हणून, त्याच्या वडिलांचे वय = ( ४८ – x ) वर्षे ➡️ चार वर्षांपूर्वी राजेशचे वय = […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५८ ✍️ अमिताचा जन्म झाला तेंव्हा तिच्या वडिलांचे वय २८ वर्षे होते. तिच्याहून चार वर्षांनी लहान असलेल्या अमितचा जन्म झाला तेंव्हा तिची आई २८ वर्षांची होती तर तिच्या आईवडिलांच्या वयात अंतर किती? ➡️ उत्तर :- अमिताच्या जन्माच्या वेळी तिच्या वडिलांचे वय = २८ वर्षे अमितच्या जन्माच्या वेळी अमिताच्या वडिलांचे वय […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५७ ✍️ एका महाविद्यालयात ५ परीक्षक रोज ६ तास काम करून पेपरचे गठ्ठे १२ दिवसात तपासतात तर त्याच्या दुप्पट गठ्ठे ८ परीक्षकांना १५ दिवसांत द्यायचे असतील तर रोज किती तास काम करावे लागेल? ➡️ उत्तर :- ८ परीक्षकांना १५ दिवसात पेपर्स तपासून देण्यासाठी रोज x तास काम करावे लागेल असे […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५६ ✍️ २ डझन रबरी चेंडू ९०० रुपयांना विकल्यामुळे ६ रबरी चेंडूच्या खरेदी किमतीएवढा तोटा होतो तर एका रबरी चेंडूची खरेदी किंमत किती? ➡️ उत्तर :- २ डझन रबरी चेंडूची विक्री किंमत = ₹ ९०० …….(i) या व्यवहारात होणारा तोटा = ६ रबरी चेंडूची खरेदी किंमत ➡️ म्हणून, २डझन रबरी चेंडूची […]
✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५५✍️ एका कंपनीत ५ दिवसाचा आठवडा असून दररोज ८ तास काम करावे लागते. नियमित कामाच्या तासाचे ५० रुपये तर जादा तास काम ( ओव्हरटाईम ) केल्यास प्रतितास ५५ रुपये मिळतात. सागरने त्या कंपनीत ४ आठवडे काम केले. त्याला एकूण १२४०० रुपये मिळाले असतील तर त्याने किती तास जादा काम केले? ➡️उत्तर […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५४ ✍️ २ शर्ट आणि ३ साड्या यांची किंमत ३२०० रुपये आहे. तेवढ्याच पैशात ६ शर्ट आणि १ साडी घेता येते तर ८ साड्यांची किंमत किती? ➡️ उत्तर :- एका शर्टाची किंमत x रुपये तर एका साडीची किंमत y रुपये मानू. म्हणून, ८ साड्यांची किंमत = ८y ➡️ पहिल्या अटीवरून, २x + […]
✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५३✍️ काही पुरुष एक काम ५० दिवसात पूर्ण करतात. जर पुरुषांची संख्या १० ने वाढली तर ते काम पूर्ण करण्यास २० दिवस कमी लागतात. सुरुवातीला किती पुरुष होते? ➡️उत्तर :- सुरुवातीला x पुरुष होते असे मानू. ➡️ दिलेल्या माहितीनुसार, ( x + १० ) / x = ५० / ३० ३( x […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र.५२ ✍️ एका क्रिकेट सामन्यात अभिजित ने चंदनच्या दुप्पट धावा केल्या. चंदन आणि अमोल यांच्या धावांचे प्रमाण २:३ आहे. जर तिघांनी मिळून त्या सामन्यात २७० धावा काढल्या तर चंदनने किती धावा केल्या? ➡️उत्तर :- अभिजित आणि चंदन यांच्या धावांचे प्रमाण = २:१……(i) चंदन आणि अमोल यांच्या धावांचे प्रमाण = २:३ …….(ii) अभिजित […]

