✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५१ ✍️ ३० मे २०२० रोजी रत्नागिरीत होणाऱ्या ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहण्यासाठी मुंबईतील विश्वस्तांनी रेल्वेने जायचे ठरवले. तिकीटखर्चापोटी लागणारे ५६७० रुपये सर्वांकडून समान रक्कम घेऊन मृणाल यांनी किरण आणि वैशाली यांच्याकडे जमा केली. परंतु नागपूरकर अमृताताईंनी मुंबईहून रत्नागिरीस जाण्याची ईच्छा व्यक्त केल्यामुळे त्यांच्या तिकिटासाठी ( मुंबई […]
✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५०✍️ प्रगतशील शेतकरी धनुभाऊंनी आपल्या शेतात १७६४ पपईच्या रोपांची लागवड केली. त्यासाठी शेतात जेवढ्या ओळी (सरी) केल्या होत्या तेवढीच पपईची रोपे त्यांनी एका ओळीत लावली तर ओळींची (सरींची) संख्या किती आहे? ➡️उत्तर :- ओळींची ( सरींची ) संख्या x आहे असे मानू. म्हणून, एका ओळीतील पपईच्या रोपांची संख्या = x ➡️आपल्याला […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ४९ ✍️ परीक्षेत एका संख्येला २५ ने गुणा असा प्रश्न होता. तेजसने नजरचुकीने ५२ ने गुणल्यामुळे त्याचे उत्तर मूळ उत्तरापेक्षा ४८६ ने जास्त आले. तर ती संख्या कोणती? ➡️उत्तर :- ती संख्या x आहे असे मानू. २५ ने गुणल्यामुळे येणारे उत्तर = २५x ५२ ने गुणल्यामुळे येणारे उत्तर = ५२x […]
✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ४८✍️ पनवेलमधील सुकापूर गावाची लोकसंख्या १५००० आहे. त्यातील दोन तृतीयांश पुरुष तर उर्वरित स्त्रिया आहेत. जर गावातील ३०% पुरुष विवाहित असतील तर त्या गावातील किती टक्के स्त्रिया अविवाहित आहेत? ➡️उत्तर :- सुकापूर गावाची लोकसंख्या = १५,००० पुरुषांची संख्या = १५००० × २/३ पुरुषांची संख्या = १०,००० ➡️म्हणून, स्त्रियांची संख्या = १५,००० […]
✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ४७✍️ प्रिया आणि जिया एक काम १२ दिवसात पूर्ण करतात. जिया आणि श्रीया तेच काम १५ दिवसात तर प्रिया आणि श्रीया २० दिवसांत पूर्ण करतात. तर ते काम तिघी मिळून किती दिवसात पूर्ण करतील? ➡️उत्तर :- प्रिया ते काम x दिवसांत , जिया y दिवसांत तर श्रीया z दिवसात पूर्ण करते […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ४६ ✍️ हितेश आणि मितेश एकाच वेळी, एकाच ठिकाणाहून एकाच दिशेने निघाले. हितेशचा वेग ४.५ किमी प्रतितास आणि मितेशचा वेग ५ किमी प्रतितास असेल तर किती वेळाने ते एकमेकांपासून तीन किमी अंतरावर असतील? ➡️उत्तर :- हितेशचा चालण्याचा वेग = ४.५ किमी प्रतितास मितेशचा चालण्याचा वेग = ५ किमी प्रतितास ➡️ […]
✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ४५✍️ माधवरावांनी चार चाकी गाडी विकत घेण्यासाठी बँकेतून द.सा. द. शे. ९ दराने ५ वर्ष मुदतीचे सरळव्याजाने कर्ज घेतले. जर या कर्जापोटी नव्वद हजार रुपये व्याज भरावे लागले असेल तर माधवरावांनी किती रकमेचे कर्ज काढले होते? ➡️उत्तर :- सरळव्याज = ₹ ९०००० व्याजदर ( द ) = द. सा. द. शे. […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ४४ ✍️ मनीषने पनवेलजवळील आपले फार्महाऊस व पनवेलमधील घर प्रत्येकी तीस लाख रुपयांत विकले. घरविक्रीत त्याला २० % नफा तर फार्महाऊस विक्रीत त्याला २०% तोटा झाला. तर या संपूर्ण व्यवहारात मनीषला………झाला. ➡️उत्तर :- घराची खरेदी किंमत १०० रुपये आहे असे मानू. नफा = २०% ➡️म्हणून घराची विक्री किंमत = ₹ […]
✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ४३✍️ मीराबाईने भाजीविक्रीतुन मिळवलेले ५१०० रुपये बँकेत जमा केले. त्यांनी ही रक्कम वीस, पन्नास आणि शंभर रुपयांच्या नोटांच्या स्वरूपातच जमा केली. जर तिन्ही नोटांची संख्या समान असेल तर मिराबाईंनी एकूण किती नोटा बँकेत जमा केल्या? ➡️उत्तर :- मिराबाईंनी तिन्ही प्रकारच्या प्रत्येकी x नोटा बँकेत जमा केल्या असे मानू. म्हणून, मिराबाईंनी बँकेत […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ४२ ✍️ राजश्रीला तिच्या वडिलांनी नवीन वर्षानिमित्त १०० च्या काही नोटा व ५०० च्या काही नोटा मिळून ५००० रुपये भेट दिले. तेंव्हा राजश्री आपल्या वडिलांना म्हणाली तुम्ही मला जेवढ्या पाचशे रुपयांच्या नोटा दिल्या तेवढ्या १०० रुपयांच्या दिल्या असत्या आणि जितक्या शंभर रुपयांच्या नोटा दिल्या तितक्याच ५०० रुपयांच्या नोटा दिल्या असत्या […]

