✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १११ ✍️ दोन अंकी संख्या तिच्या अंकांच्या बेरजेहून २७ ने मोठी आहे. तर त्या संख्येच्या दशकस्थानी कोणता अंक असेल? ➡️ उत्तर :- दोन अंकी संख्येच्या दशकस्थानाचा अंक x तर एकक स्थानाचा अंक y मानू. ➡️ म्हणून, ती दोन अंकी संख्या = १०x + y ➡️ दिलेल्या माहितीनुसार, १०x + y = ( x […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११० ✍️ एका वर्गातील ३० विद्यार्थी आणि वर्गशिक्षक यांच्या वयाची सरासरी १६ वर्षे आहे. वर्गशिक्षक वगळता वयाची सरासरी १ ने कमी होते. तर वर्गशिक्षकांचे वय किती? ➡️ उत्तर :- वर्गशिक्षकांचे वय x वर्षे मानू. आपल्याला माहिती आहे की, सरासरी = सर्व पदांची बेरीज / पदांची एकूण संख्या ➡️ म्हणून, ३० विद्यार्थी आणि […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०९ ✍️ कलिकाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय २५ वर्षे होते. आईचे आजचे वय कलिकाच्या आजच्या वयाच्या तिपटीपेक्षा तीन वर्षांनी कमी आहे. तर कलिकाच्या आईचे आताचे वय काढा. ➡️ उत्तर :- कलिकाचे आजचे वय x वर्ष आहे असे मानू. ➡️ म्हणून, कलिकाच्या आईचे आताचे वय = (३x – ३ ) वर्षे […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०८ ✍️ x या संख्येला ५ ने भागले तर बाकी ३ उरते. जर ३x ला ५ नेच भागले तर बाकी किती उरेल? ➡️ उत्तर :- आपल्याला माहिती आहे की , भाज्य = भाजक × भागाकार + बाकी भागाकार आपण y मानू. ➡️ दिलेल्या माहितीनुसार, x = ५y + ३………(i) ➡️ म्हणून, ३x = […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र.१०७ ✍️ पीठाच्या गिरणीमध्ये दळण बांधण्यासाठी ०.३५ मीटर सुतळी लागते. तर १५.७५ मीटर लांब असलेल्या सुतळीचे दळण बांधण्यासाठी किती तुकडे तयार होतील? ➡️ उत्तर :- त्या सुतळीचे दळण बांधण्यासाठी एकूण x तुकडे तयार होतील असे मानू. सुतळीच्या एका तुकड्याची लांबी = ०.३५ मीटर ➡️ दिलेल्या माहितीनुसार, x = १५.७५ / ०.३५ x […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र.१०६ ✍️ आज गुरुवार दिनांक १३ ऑगस्ट २०२०. गेल्या वर्षी याच तारखेला गणिताशी गट्टीचा पहिला प्रश्न विचारला गेला तर त्या तारखेला कोणता वार होता? ➡️ उत्तर :- सामान्य वर्षात ३६५ दिवस असतात म्हणजे ५२ आठवडे अन एक दिवस. ➡️म्हणून, सामान्य वर्षांत एक दिवस जादा असल्याने पुढील वर्षी त्याच तारखेला वार १ […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०५ ✍️ सकाळी ठीक साडेनऊ ( ९:३०) वाजता मिनीटकाटा आणि तासकाटा दरम्यान किती मापाचा कोन असेल? ➡️ उत्तर :- बारा तासांत तासकाटा ३६०° फिरतो. ➡️म्हणून, साडेनऊ म्हणजेच १९/ २ तासात तासकाट्याचा कोन = [( ३६०/१२ )(१९/२)]° = [१५ × १९ ]° = २८५° ६० मिनिटांत मिनिटकाटा ३६०° फिरतो. ➡️म्हणून, […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०४ ✍️ चक्रवाढव्याजाने काही ठराविक रक्कम ६ वर्षात तिप्पट होते तर ती रक्कम चक्रवाढ व्याजानेच नऊपट होण्यास किती वर्षे लागतील? ➡️ उत्तर :- आपल्याला माहिती आहे की , रास = मुद्दल [ १ + ( दर/१००)] ^मुदत मुद्दल x रुपये मानू. ➡️ म्हणून, रास = ३x रुपये ➡️ म्हणून, ३x = x[ १ […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०३ ✍️ एका व्यापाऱ्याने ७० रुपये किलो किमतीच्या २० किलो तांदळाच्या गोणीमध्ये ५५ रुपये किलो किमतीचे तांदूळ मिसळले आणि ते तांदूळ ७२ रुपये किलोने विकून २०% नफा कमावला. तर त्याने ५५ रुपये किलोचे किती किलो तांदूळ त्या गोणीत मिसळले होते? ➡️ उत्तर :- ५५ रुपये किलोचे x किलो […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०२ ✍️ सरळव्याजाने १० वर्षात बँकेत गुंतवलेली रक्कम दुप्पट झाली असेल तर त्या बँकेचा द. सा. द. शे. व्याजदर किती? ➡️ उत्तर :- बँकेचा द. सा. द. शे. दर x तर गुंतवलेली रक्कम y मानू. आपल्याला माहिती आहे की, सरळव्याज = ( म × द × क)/१०० […]

