✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १३९ ✍️ दत्तू नाव वल्हवत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ४ तासात ४० किमी अंतर कापतो आणि तेवढ्याच वेळात प्रवाहाच्या दिशेने ८८ किमी जातो. तर प्रवाहाचा वेग काढा. ➡️ उत्तर :- दत्तूचा नाव वल्हविण्याचा वेग x किमी प्रतितास तर प्रवाहाचा वेग y किमी प्रतितास आहे असे मानू. ∴ प्रवाहाच्या दिशेने नावेचा वेग […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र.१३८ ✍️ एक दूध विक्रेता दूध ज्या किमतीला खरेदी केले त्याच किमतीत विकत असल्याचा दावा करत होता. प्रत्यक्षात तो दुधात पाणी मिसळून ३० % नफा कमवायचा. जर तो रोज १३० लिटर दुध विकत असेल तर त्यात किती लिटर पाणी मिसळलेले असेल? ( पाणी मुबलक प्रमाणात असल्यामुळे ते फुकटच मिळत होते हे गृहीत […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र.१३७ ✍️ अमरचा चालण्याचा वेग ४ किमी प्रतितास असून समरचा चालण्याचा वेग ५ किमी प्रतितास आहे. एकदा अमर आणि समर यांनी एकाच ठिकाणाहून एकाचवेळी चालण्यास सुरुवात केली आणि नियोजित स्थळी समर अमरच्या १५ मिनिटे अगोदर पोहोचला. तर ते नियोजित स्थळ सुरुवातीच्या ठिकाणाहून किती अंतरावर होते? ➡️ उत्तर :- ते नियोजित स्थळ सुरुवातीच्या […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १३६ ✍️ एक हौद दहा तासांत भरतो परंतु त्याच्या तळाशी छिद्र पडल्यामुळे त्याला पूर्ण भरण्यासाठी आता १२ तास लागतात. जर तो पूर्ण भरलेला असेल तर रिकामा होण्यास किती वेळ लागेल? ➡️ उत्तर :- तो हौद रिकामा होण्यास x तास लागतील असे मानू. ∴ तो हौद एका तासात १ /x इतका रिकामा […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १३५ ✍️ अभिजितला ज्ञानभाषा मराठीच्या विविध व्हाट्सअप समूहात पोस्ट टाकण्यासाठी १२ मिनिटे लागतात तर संजय यांना तेच काम करण्यासाठी १० मिनिटे लागतात. एके दिवशी संजय पोस्ट टाकण्यास सुरुवात करून पाच मिनिटे झाली आणि त्यांच्या मोबाईलची रेंज गेली त्यामुळे उर्वरित काम अभिजितला करावे लागले. तर ते उर्वरित काम करण्यासाठी अभिजीतला किती वेळ […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १३४ ✍️ चंदन ने ₹ ५०,००० गुंतवून एक दुकान थाटले. दोन महिन्याने नंदनने ₹ ५०,००० गुंतवून चंदनसोबत भागीदारी केली. वर्षाअखेर त्यांना ₹ ५५,००० चा नफा झाला तर त्यात चंदनचा वाटा किती? ➡️ उत्तर :- चंदन आणि नंदन यांच्यातील गुंतवणूकीचे गुणोत्तर = ५०००० × १२ : ५०००० × १० = ६ : […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १३३ ✍️ नववी अ च्या वर्गातील मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या दीडपट आहे. जर मुलांची संख्या ४ ने कमी असती आणि मुलींची संख्या ४ ने जास्त असती तर मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या दुप्पट झाली असती. तर नववी अ चा पट किती? ➡️ उत्तर :- मुलींची संख्या = १.५ × मुलांची संख्या […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १३२ ✍️ अब्दुल ने एक खेचर आणि एक गाढव प्रत्येकी १५,००० रुपयांना विकले. त्यापैकी एका व्यवहारात २५ % नफा तर दुसऱ्या व्यवहारात त्याला २५% तोटा झाला. या संपूर्ण व्यवहारात अब्दुलला ……..होईल? ➡️ उत्तर :- खेचर आणि गाढव यांची एकत्रित विक्री किंमत = १५,००० + १५,००० = ₹ ३०,००० खेचराची खरेदी किंमत […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १३१ ✍️ एका स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी ३५% गुण मिळविणे आवश्यक होते. लक्षने त्या परीक्षेत १३१ गुण मिळवूनही पास होण्यासाठी त्याला ९ गुण कमी पडले तर एकूण किती गुणांची ती स्पर्धा परीक्षा होती? ➡️ उत्तर :- ती स्पर्धा परीक्षा x गुणांची होती असे मानू. लक्षने मिळविलेले गुण = १३१ उत्तीर्ण […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १३० ✍️ इरा आणि सुचिकांत यांच्या वयाची बेरीज ४६ वर्षे असून त्यांच्या वयाचा गुणाकार २७३ आहे तर इराचे वय किती? ➡️ उत्तर :- इराचे वय x वर्षे मानू. ∴ सुचिकांतचे वय = ( ४६ – x ) वर्षे ➡️ दिलेल्या माहितीनुसार, x ( ४६ – x ) = २७३ ∴ ४६x – x² […]

