✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०९ ✍️ कलिकाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय २५ वर्षे होते. आईचे आजचे वय कलिकाच्या आजच्या वयाच्या तिपटीपेक्षा तीन वर्षांनी कमी आहे. तर कलिकाच्या आईचे आताचे वय काढा. ➡️ उत्तर :- कलिकाचे आजचे वय x वर्ष आहे असे मानू. ➡️ म्हणून, कलिकाच्या आईचे आताचे वय = (३x – ३ ) वर्षे […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०८ ✍️ x या संख्येला ५ ने भागले तर बाकी ३ उरते. जर ३x ला ५ नेच भागले तर बाकी किती उरेल? ➡️ उत्तर :- आपल्याला माहिती आहे की , भाज्य = भाजक × भागाकार + बाकी भागाकार आपण y मानू. ➡️ दिलेल्या माहितीनुसार, x = ५y + ३………(i) ➡️ म्हणून, ३x = […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र.१०७ ✍️ पीठाच्या गिरणीमध्ये दळण बांधण्यासाठी ०.३५ मीटर सुतळी लागते. तर १५.७५ मीटर लांब असलेल्या सुतळीचे दळण बांधण्यासाठी किती तुकडे तयार होतील? ➡️ उत्तर :- त्या सुतळीचे दळण बांधण्यासाठी एकूण x तुकडे तयार होतील असे मानू. सुतळीच्या एका तुकड्याची लांबी = ०.३५ मीटर ➡️ दिलेल्या माहितीनुसार, x = १५.७५ / ०.३५ x […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र.१०६ ✍️ आज गुरुवार दिनांक १३ ऑगस्ट २०२०. गेल्या वर्षी याच तारखेला गणिताशी गट्टीचा पहिला प्रश्न विचारला गेला तर त्या तारखेला कोणता वार होता? ➡️ उत्तर :- सामान्य वर्षात ३६५ दिवस असतात म्हणजे ५२ आठवडे अन एक दिवस. ➡️म्हणून, सामान्य वर्षांत एक दिवस जादा असल्याने पुढील वर्षी त्याच तारखेला वार १ […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०५ ✍️ सकाळी ठीक साडेनऊ ( ९:३०) वाजता मिनीटकाटा आणि तासकाटा दरम्यान किती मापाचा कोन असेल? ➡️ उत्तर :- बारा तासांत तासकाटा ३६०° फिरतो. ➡️म्हणून, साडेनऊ म्हणजेच १९/ २ तासात तासकाट्याचा कोन = [( ३६०/१२ )(१९/२)]° = [१५ × १९ ]° = २८५° ६० मिनिटांत मिनिटकाटा ३६०° फिरतो. ➡️म्हणून, […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०४ ✍️ चक्रवाढव्याजाने काही ठराविक रक्कम ६ वर्षात तिप्पट होते तर ती रक्कम चक्रवाढ व्याजानेच नऊपट होण्यास किती वर्षे लागतील? ➡️ उत्तर :- आपल्याला माहिती आहे की , रास = मुद्दल [ १ + ( दर/१००)] ^मुदत मुद्दल x रुपये मानू. ➡️ म्हणून, रास = ३x रुपये ➡️ म्हणून, ३x = x[ १ […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०३ ✍️ एका व्यापाऱ्याने ७० रुपये किलो किमतीच्या २० किलो तांदळाच्या गोणीमध्ये ५५ रुपये किलो किमतीचे तांदूळ मिसळले आणि ते तांदूळ ७२ रुपये किलोने विकून २०% नफा कमावला. तर त्याने ५५ रुपये किलोचे किती किलो तांदूळ त्या गोणीत मिसळले होते? ➡️ उत्तर :- ५५ रुपये किलोचे x किलो […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०२ ✍️ सरळव्याजाने १० वर्षात बँकेत गुंतवलेली रक्कम दुप्पट झाली असेल तर त्या बँकेचा द. सा. द. शे. व्याजदर किती? ➡️ उत्तर :- बँकेचा द. सा. द. शे. दर x तर गुंतवलेली रक्कम y मानू. आपल्याला माहिती आहे की, सरळव्याज = ( म × द × क)/१०० […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०१ ✍️ ४००० मीटर लांबीचा बेर्डेवाडी बोगदा पार करण्यासाठी रेल्वेला किती वेळ लागतो हे पाहण्यासाठी अक्षय बोगद्याबाहेर उभा आहे. त्याच्या निरीक्षणानुसार रेल्वेला बोगदा पार करण्यासाठी ३ मिनिटे ४४ सेकंद लागले आणि त्याला ओलांडण्यासाठी रेल्वेला २४ सेकंद लागले. जर रेल्वे एकसमान वेगाने धावत असेल तर त्या रेल्वेची लांबी किती? ➡️ उत्तर :- […]
✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०० ✍️ मराठी शाळा व मराठी भाषा संवर्धन यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणाऱ्या ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या एकूण व्हाट्सअप समूहापैकी एक दशांश समूह हे मराठी शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांचे आहेत. त्यातून उरलेल्या समूहाच्या एक तृतीयांश समूह जिल्हानिहाय/ विभागनिहाय आहेत. त्यानंतर उर्वरित समूहाच्या एक दशांश समूह आरोग्यविषयक बाबींशी संबंधित आहेत. जेवढे आरोग्यविषयक समूह आहेत […]

